मातृत्व..

मातृत्व या विषयावर आज लिहावस वाटतय, जे अनुभवलय ते शब्दात मांडता येते का हे पाहण्याचा हा एक लहानसा प्रयास. ‘मातृत्व’ या शब्दाची व्याप्ती सर्वोतोपरी खोल पण आहे आणि काही ठिकाणी उथळ देखील. या एका शब्दाभोवती स्त्री वर्गाची आयुष्यभराची गणित फिरतात आणि काही अंशी पुरुष वर्गाची सुद्धा. आता ते कसे काय यावर थोडासा प्रकाश टाकावासा वाटतो.
स्त्रीसाठी मातृत्व म्हणजे बाळाला गर्भात वाढवणे त्यानंतर त्यास जन्म देणे मुलगा/ मुलगी यानुसार इतरांची प्रतिक्रिया उमटणे अशा प्रकारचे अनुभव सर्वसाधारपणे सगळ्यांनी अनुभवलेले असतात. पण इतकी साधी सोपी दिसावी तशी ही संकल्पना नाही.
मातृत्व म्हणजे एका स्त्रीची नवीन ओळख एक आई म्हणून मातृत्व म्हणजे या सृष्टीत / जीवनचक्रात आपण दिलेलं योगदान आहे मातृत्व म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म इथे बाळ आईला नवीन जीवनदान देत असते, प्रसुतीच्या वेदना केवळ आईस नाही तर जन्म घेणाच्या बाळास देखील तिची आपल्या कणखर आणि धैर्यशील आईची ओळख अगदी जन्मापासून करून देत असते स्वतःच्या अस्तित्वापुरता विचार करणारी व्यक्ती आता सर्वोतोपरी आपल्या मुलांसाठी समर्पित झालेली असते.
या विश्वात आईचं प्रेम म्हणजेच मातृत्व हे सर्वोच्च स्थानी का असतं ? आईच्या प्रेमाची शिदोरी, तिच आपल्या मुलांविषयीच प्रेम प्रत्येक दिवसागणिक द्विगुणित होत असतं, तिला आपलं मूल रोज नव्याने गवसत, रोज नव्याने आई आपल्या मुलांच्या प्रेमात आणि मायेत न्हाऊन निघते. जीवन जगताना तिच्या वाटेत असंख्य समस्या आल्या तरी तिच्या मातृत्वाचे बुरुज कधीच ढासळत नाहीत. कुठल्याही परिस्थितीत ती आपल्या मुलांची सुरक्षा कवच म्हणा, कवचकुंडले म्हणा किंवा एक अभेदय ढाल म्हणा ती तशीच असते जेव्हापासून ती मातृत्व स्विकारते.
या नात्याला ना कोणते पण, परंतु असतात, ना स्वार्थाची ना समाजाच्या नियमांची झालर असते, असतो तो फक्त मायेचा वाहणारा अखंड झरा म्हणूनच म्हणतात की , जर आईने आपल्या मुलांच नशीब लिहिल असत तर आज कोणत्याच व्यक्तीच्या आयुष्यात सुख दुःखाची चक्रे फिरली जसती , म्हणून की काय या सृष्टीच्या निर्मात्याने हे अधिकार आईच्या वाट्यास दिले नाहीत . खरे तर नाही दिलेत हेच बरं आहे हे मातृत्व बाळास व आईस एक नवा जन्म देते पण कर्म ज्याचे त्याने सावरायचे असते .
या कर्माच्या फेऱ्यातही या मातृत्वाची छत्रछाया सदैव आपल्या सोबत असते . असं हे कधीही न संपणारे , उत्तरोत्तर वाढत जाणारे , जगातील सर्व नात्यां मध्ये उच्चस्थानी असणारे हे मातृत्व सगळ्यांनी समजून घेणे फार महत्वाचे आहे .
आता आपण मातृत्वाच्या संकल्पनेला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया . आईने जन्म दिला आणि तिला मातृत्व प्रदान झाले यावर इथे सर्वकाही संपत नाही . मातृत्वाची भावभावना येण्यासाठी मुलाला जन्म देणे हे काही बंधनकारक नाही , -बाळास जन्म देणे म्हणजे स्त्रीचे मातृत्व सिद्ध होते असेही नाही . मातृत्व म्हणजे दुसऱ्याला आपल्यातील चांगल्या गोष्टी देऊ करणे . समोरच्या व्यक्तीस निस्वार्थ जीव लावणे , दुसऱ्यास स्विकारणे , मनाचा मोठेपणा आणि जगाच्या रीतीभातींना वेळेनुसार आव्हान देणे अगदी जसं आधी म्हटल्याप्रमाणे एखादया अभेदय ढालीप्रमाणे आणि हो या प्रकारचे मातृत्व हे पुरुष व स्त्री असा भेदभाव देखील करीत नाही एखादया पुरुषासही या भावनेने स्वत : स कृतकृत्य करता येईल .
इथपर्यंत आपण मातृत्वाची व्याप्ती खोली जाणून घेण्याचा प्रयत्न केला आता यासंकल्पनेचा उथळपणाही पहायला हवा . जगाच्या रीतीभातीत आणि आपली प्रतिष्ठा जपण्याच्या प्रयत्नात मातृत्व हा एक यांत्रिकीविषय असल्यासारखे , हा एक सामाजिक समस्या असल्यासारखं याकडे पाहिलं जाते . घरातील मंडळी मातृत्वाचे घरच्या स्त्रीवर एक बंधन लादल्याप्रमाणे त्याची सक्ती करतात , काहीतर त्याची मागणी करतात . खरं पहायला गेलं तर हा त्या स्त्रीच्या मनाची सकारात्मक किंवा या उथळ विचारांनी नकारात्मक बांधणी करणारा विषय आहे .
अशा प्रकारे मातृत्व या संकल्पनेला अनेक पैलू आहेत . आता आपण कोणत्या प्रकारचे अनुभव घ्यावे व कशाचे समर्थन करावे हे देखील सकारात्मक दृष्टिने ठरविणेमहत्त्वाचे आहे . सामाजिक बदलाची सुरुवात ही नेहमी स्वतःपासून होत असते . तर मग आपण होऊ शकतो का हा एक बदल ?

TRANSLATION IN HINDI PROVIDED
मातृत्व ..
यह देखने का एक छोटा सा प्रयास है कि क्या अनुभव को शब्दों में व्यक्त किया जा सकता है। ‘मातृत्व’ शब्द का दायरा बहुत गहरा है और कहीं-कहीं उथला भी। यह एक शब्द महिला वर्ग के आजीवन गणित और कुछ हद तक पुरुष वर्ग के इर्द-गिर्द घूमता है। अब मैं कुछ प्रकाश डालना चाहता हूं कि यह कैसे काम करता है।
एक महिला के लिए, मातृत्व गर्भ में बच्चे को पालने और फिर उसे जन्म देने की प्रक्रिया है। लेकिन ये प्रक्रिया उतनी सरल नहीं है जितनी यह लगती है।
मातृत्व एक महिला की नई पहचान है। एक माँ के रूप में मातृत्व इस सृष्टि/जीवन चक्र में आपका योगदान है। मातृत्व एक महिला का दूसरा जन्म है। यहां बच्चा मां को नया जीवन देता है। जो व्यक्ति जन्म से ही अपने अस्तित्व के बारे में सोचता है, वह अब अपने बच्चों के प्रति समर्पित हो जाताहै।
इस ब्रह्मांड में मातृत्व का सर्वोच्च स्थान क्यों है? माँ की ममता बच्चो केलि ये एक पुंजी है, बच्चों के प्रति उनका प्यार दिन-ब-दिन दुगना होता जाता है, वह हर दिन अपने बच्चे को नए सिरे से पाती है, हर दिन माँ अपने बच्चों के प्यार और स्नेह में नहाती है। हालाँकि उसे अपने जीवन में कई कठिनाइयों का सामना करना पड़ता है लेकिन उसके मातृत्व के शिखर कभी कमजोर नही पडते। वैसे भी, वह शुरू से ही मातृत्व को स्वीकार करती है,और अपने बच्चो के लिये एक सुरक्षाकवच कहे या फिर एक कवच कुंडल कहे या फिर एक कभी न तुटनेवाली ढाल बन जाती है
मातृत्व के रिश्ते जैसी कोई चीज नहीं होती, कोईस्वार्थ नहीं होता, समाज केकोई नियम नहीं होते, बस एक बहता ममता एक अखंड झरना होता है!
इसीलिए कहा जाता है कि अगर एक मां ने अपने बच्चों का नसीब लिखा होता तो आज किसी भी व्यक्ति के जीवन में सुख-दुख का चक्र नही आता। वास्तव में, वह भाग्य न देना बेहतर है। मातृत्व एक नए बच्चे और मां को जन्म देता है, लेकिन कर्म तो अपने अपने सवाराने होते है।
कर्म के इस चक्र में भी मातृत्व की छात्रछाया हमेशा हमारे साथ रहती है। हर किसी के लिए यह समझना महत्वपूर्ण है कि मातृत्व दुनिया के सभी रिश्तों में कभी न खत्म होने वाला, हमेशा बढ़ने वाला, और हर एक रिश्ते में उच्च स्थान पर है।
आइए अब हम मातृत्व की अवधारणा को एक अलग नजरिए से देखें। मां णे जन्म दिया तो यह कहानी का अंत नहीं है। मातृत्व की भावना के लिए बच्चे को जन्म देना अनिवार्य नहीं है, बच्चे को जन्म देने से यह साबित नहीं होता कि महिला मां है।
मातृत्व किसी की अच्छी चीजें दूसरे को देने की क्रिया है। सामने वाले की निस्वार्थता, दूसरे की स्वीकृति, मन की महानता और समय के साथ दुनिया के रीति-रिवाजों को चुनौती देना, एक अभेद्य ढाल की तरह और हाँ इस तरह का मातृत्व पुरुष और महिला के बीच भेदभाव नहीं करता है।
अभी तक हमने मातृत्व के दायरे की गहराई जानने की कोशिश की है, अब हमें अवधारणा की उथल-पुथल को देखना होगा। मातृत्व को एक सामाजिक मुद्दे के रूप में देखा जाता है, क्योंकि यह एक प्रतिष्ठा विषय है, दुनिया के तरीके से और हमारी गरिमा को बनाए रखने के प्रयास में घर की महिला पर मातृत्व का बंधन थोपा जाता है, काही जगहोन्पर उसकी मांग कि जाती है। वास्तव में यह बात है कि इन विचारों से महिला का मन सकारात्मक है या नकारात्मक रूप में आकार लेता है
इस प्रकार मातृत्व की अवधारणा के कई पहलू हैं। अब यह महत्वपूर्ण है कि आप सकारात्मक तरीके से निर्णय लें कि आपको किस तरह का अनुभव होना चाहिए और आपको किसका समर्थन करना चाहिए। सामाजिक परिवर्तन हमेशा अपने से शुरू होता है। तो क्या यह बदलाव हो सकता है?

Comments

  1. Urmila Fund

    खुप सुंदर आहे.अगदी मोजक्या शब्दात वर्णन केले आहे.पण ह्रदय द्रावक आहे.

  2. Ujjwala Babar

    Nice writing,words are properly placed,You have explained Motherhood in precise and nice words….

  3. माधुरी नवनाथ बदर

    खूपच छान लेख आहे….वाचून खूप छान वाटलं

Leave a Reply

Your email address will not be published.