By Dr Snehal Gorde
आज १० वर्षांनी त्यांची भेट झाली..काळया रंगाच्या कॉटन च्या साडीत ती अगदी खुलून दिसत होती...तो क्षणभर पाहतच राहिला..मुळातच साडी मधली ती त्याला प्रचंड आवडायची..त्याल बघताच धावत येणारी ती आज शांतपणे त्याच्याकडे चालत येत होती..तिच्या चालण्यातला तो बदल त्याने लगेच हेरला..दोघांची नजरा नजर झाली..तिने त्याला पाहिलं..
पांढरा शर्ट आणि फिकट निळी जीन्स.. त्याचं favourite combination.. तोच चेहरा तीच अंगकाठी . डोळ्याच्या कडा हलक्या काळवंडलेल्या..एरवी नेहमी खळखळून हसणारा तो आज स्मित हास्य करत होता.पण त्या हास्यातील प्रसन्नता मात्र तशीच होती. त्याला बघताच तीही अडखळली..
दोघे एकमेकांच्या समोर आले.. फक्त एकमेकांना बघत होते..भरलेल्या नजरेने.. इतक्या वर्षांचं साठलेलं प्रेम डोळ्यातून व्यक्त होत होतं. दोघे न बोलताही खूप काही बोलत होते .त्याने स्वतःला सावरलं." Hi.. बस" त्याच्या आवाजाने ती भानावर आली आणि बसली...
ती - खूप उशीर झाला का मला?
तो - नाही
ती - बराच वेळ झाला तू वाट पहात आहे का?
तो - हो..गेली १० वर्ष.
त्याच्या या एका वाक्याने १० वर्षांचं अंतर निमिषार्धात पार झालं..
By Dr Snehal Gorde
Comments