top of page

शाळा

By Kaustubh Rajendra Dherge


बालवाडी म्हणजे शैक्षणिक आयुष्याचा प्रारंभ ।

त्यावेळी शाळेच्या विचारानेच होतात अश्रू आरंभ ।।

प्राथमिक शाळेचा सहवास होता अगदीच निराळा ।

गालावर येते हसू, करताना त्या आठवणींचा उजाळा ।।

साधी होती बैठक आमची , बसायचो घालून मांडी ।

खोटी कारणं देऊन, उगाच मारायचो शाळेला दांडी ।।

माध्यमिक शिक्षणाचा आनंद घेत केल्या असंख्य खोड्या ।




शिक्षकांचा मार खात, शिव्या देखील खाल्ल्या थोड्या ।।

वंदे मातरम् आणि राष्ट्रगीताला पाळायचो सर्व शिस्त ।

चालू तासात मात्र व्हायचा आमचा डबा फस्त ।।

लाडक्या डिसेंबर महिन्यात असायचे क्रीडा महोत्सव आणि सहल ।

दहीहंडी असायचा आमचा सर्वात मोठा उत्सव ।।

दहावी बोर्डात पास झालो, बदलले सवंगड्यांचे मार्ग ।

आयुष्यातील ती बारा वर्ष म्हणजे जणू काही स्वर्ग ।।


By Kaustubh Rajendra Dherge





28 views1 comment

Recent Posts

See All

Longing

By Sushmita Sadhu I travelled three leagues in search of your parable, Gathering dusk and doubt in this radiant shell. That chestnut bark...

ਜੇ

1 Comment

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Ritu Patil
Ritu Patil
Sep 21, 2023
Rated 5 out of 5 stars.

Nice

Like
bottom of page