By Shravani Kelaskar
हा विषय निवडताना माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले की आपण हा विषय का निवडत आहोत. एकाकी काही घटना, प्रसंग मग ते इतिहासातील असो किंवा वर्तमानातील, सर्कन माझ्या मनात चमकून गेले कारण आज आपण या ऐतिहासिक कालखंडाचे साक्षीदार आहोत हेच आपल्या सर्वांचे भाग्य आहे असे म्हणायला हरकत नाही. यावरून वेदामधले एक वाक्य आठवते ‘’मृत्योः मुशीय मामृतात !" याचा अर्थ असा की आपण दुःख, कष्ट, कलेश आणि विनाश यांच्यातून बाहेर पडून अमृताच्या दिशेने पुढे जावे आणि हेच स्वप्न आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे. ज्यांनी स्वातंत्र्यानंतरही राष्ट्र-संरक्षणाच्या परंपरेला जीवंत ठेवले अशा या वीर सैनिकांना आपण कायमच स्मरणात ठेवले पाहिजे असे मला वाटले. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिले आणि त्याच पुण्यात्म्यांनी स्वतंत्र भारताच्या पुनर्निमाणामध्ये प्रगतीची पायाभरणी ७५व्या वर्षात केली. जे देशाला इथपर्यंत घेऊन आले त्यांना कायम स्वरुपी स्मरणात ठेऊन बलशाली भारताला सशक्त सुजलाम, सुफलाम निर्भय भारत बनवणे हीच मूळ कल्पना आहे. हेच स्वप्न उराशी बाळगुन आपण सर्व या अमृत महोत्सवी वर्षात सामर्थ्याने पदार्पण करत आहोत; पण या उराशी घट्ट बांधणाऱ्या कल्पना आणि आपली ही स्वप्ने सत्यात उतरताना कुठेतरी वास्तवाचे हिंदोळेही मनात रुंजी घालतात हा आणि मग तेव्हा भूतकाळ आणि वर्तमानाची तुलना करताना कुठेतरी, काहीतरी साम्य जाणवते. ते म्हणजे महात्मा गांधींचा लढा अहिंसेचा , स्वातंत्रवीर सावरकरांचा प्रखर देशभक्ती लढा तर सुभाष चंद्र बोस यांचा सशस्त्र क्रांतीचा लढा लक्षात घेतला तर कुठेतरी हिंदोळा निर्माण होतो. ‘रणाविण स्वातंत्र कोणा मिळाले ? ' असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा जगाच्या पाठीवर भारताला मिळाले असे म्हटले जाते, पण मग
‘रगाविण स्वातंत्र कोणा मिळाले
तर मग अग ब्रम्हपुणे तुझे पाणी का गं लाल झाले?’ असाही प्रश्न तिथे निर्माण होतो आणि खरे सांगायचे झाले तर आज वास्तवही काहीचे असेच आहे. काल्पना अशी आहे की एका धर्माच्या हृदयात दुसरा धर्म असावा आणि दुसऱ्याच्या जखमा पाहताना एका धर्माचे डोळे वाहावे . जातीयता, धर्मांधता यांचे नाव नसावे, स्त्रियांना सन्मान असावा आणि कायदयाचे राज्य असणारा अमृतात न्हावून निघालेला हा माझा भारत देश असावा ही कल्पना कुठेतरी हिंदोळा निर्माण करते या वास्तवात. कारण विषमता, भ्रष्टाचारी , गुन्हेगारी,गरिबी या गोष्टी या समृद्ध देशाला कुठेतरी गालबोट लावत आहेत. माझ्या कल्पनेतील स्वतंत्र भारतातील लाखो, करोडो लोक हे धर्म, पंथ, जात हे सर्व काही बाजूला ठेवून एक भारतीय म्हणून सुखाने नांदतील. देशावर येणाऱ्या संकटाला एकजुटीने प्राण पणाला लावून झुंज देतील आणि अतिरेक्यांचे हात मुळासकट छाटून टाकतील आणि मग काय ? शत्रू राष्ट्राचीटी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मतच होणार नाही. पण जातीयता, धर्मांधता, गरिबी, भ्रष्ट्राचारी, विषमता ही बिजे परकीयांनी आपल्या देशावर आक्रमण करून लादली आणि ती पुढे तशीच वाटचाल करत स्वतंत्र भारतातही आली कारण मूठभर इंग्रज आणि मोघलांनी आपल्याच नागरिकांना सैनिक म्हणून वापरून आपल्यावरच वार केला. आणि आज हीच मानसिकता स्वतंत्र भारताला अमृत महोत्सवी वर्षात नेताना माझ्या मनावर पुन्हा प्रश्न चिन्हांचे हिंदोळे उठवित आहे. माझ्या प्रिय भारत वासियांनो डोळस होऊन जगाकडे पहा .आज अफगाणिस्तानातील नागरीक एकसंघ होऊ न शकल्याने तालिबानी अतिरेक्यांपुढे बळी पडत आहेत. असो, पण हे सगळ बाजूला वगळता या अमृत महोत्सवी वर्षाची कल्पना आणि वास्तव यातील विसंगतीचे प्रमाणही कमी होत चालले आहे हेही एक वास्तवच आहे. तुम्हीच पहा ना, ‘’जे ना देखे रवी , ते देखे कवी . जे ना देखे कवी, ते तंत्रज्ञान दाखवी.’’ ७५ वर्षापूर्वी आपण कल्पनाही केली होती का की ज्या देशात गुरुकुल पद्धती चालत आल्या, विद्यार्थी गुरुंकडे राहून शिक्षण घेत आले आज त्याच देशात विद्यार्थी आणि शिक्षक आपापल्या घरी बसून ‘ऑनलाईन’ पद्धतीद्वारे शिक्षण घेत आहेत. या दृष्याची कुणी कल्पनाही केली नसेल तरीही आज ते सत्यात उतरले. पण मग पुन्हा वास्तवाचे हिंदोळे चालूच राहतात. आजही स्त्री-भ्रुण हत्येचे पातक घडतंय, गर्भाशयातीय मुलगा-मुलगी या शोधाचा परिणाम उमलणाऱ्या असंख्य कळयांच्या अस्ताला कारणीभूत ठरला . मुलीला जन्म देऊन उपयोग तरी काय त्यापेक्षा मुलगी नकोच इथवर समाजाची मजल गेली आणि असा विचार करणारी लोक आजही समाजात वावरतात. या अमृत महोत्सवी वर्षात ही राजकीय परिस्थिती पाहता जो तो आपलाच विचार करत आहे. भोळी-भाबडी जनता मात्र आपल्या स्वप्नांची राखरांगोळी होताना उघड डोळ्याने पाहत आहे तेव्हा मात्र कवी अनिल कांबळे यांच्या काव्यपंक्ती कळकळीने आठवतात. ‘’थोडा उजेड ज्याचा मागावयास गेलो, तो सूर्यही जरासा लाचार पहिला मी.’’ पण हे विसरून चालणार नाही की याच अमृत महोत्सवी वर्षात आशेची सूर्यकिरणे आपल्या क्रिडा जगतावर पडली आणि आपण ऑलिंपिकमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदक पटकविले. आणि अशा प्रकारे आपल्या अमृत महोत्सवी वर्षाची सुंदर रित्या सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारे कल्पनेतील असंख्य स्वप्ने भविष्यात अंधाराला चिरून सोनेरी उषःकाल निर्माण करतील जेणेकरून स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षांत हे असे वास्तवाचे हिंदोळे निर्माण होणारच नाही आणि हीच मूळ संकल्पना आहे !
TRANSLATION
Diamond Jubilee, India: Idea and Reality
While choosing the subject, many questions arose in my mind as to why am I choosing this subject. All of a sudden, some events, be it history or the current, rapidly flashed in my mind because it is safe to say that it is the destiny of all of us to witness this historic event today.
From this I remember a sentence from the Vedas ‘Mrityu mukshiya maamritat!’ It means that we should come out of sorrow, hardship, tribulation and destruction and move towards nectar (Amrit, since in Marathi a period of 75 years is called ‘Amrit Mahotsav’), and this is the dream of our independence. Those who sacrificed their lives for the country's good, the pious souls that laid the foundation for progress in rebuilding an independent India must always remain alive in our memories. The ones who ultimately sacrificed their lives for the freedom of our nation, laid the foundation for progess which has got us in the 75th Independent year. With this dream in mind, we are all making a strong debut in this nectar festival year, But the idea that binds us together and the reality of our dreams come true somewhere and then when we compare the past and the present somewhere, we feel something similar. And that similarity is somewhere between comparing the past and the present, that is, Mahatma Gandhi's struggle for non-violence, Swatantraveer Savarkar's intense patriotic struggle and Subhash Chandra Bose's struggle for armed revolution.
‘Who achieved independence without bloodshed?’
When such a question is asked, it is said that India has.
Now if India won its independence without bloodshed, then why were the waters of Brahmaputra river Blood-Red?
And to be very honest today the reality is somewhat like this.
Today, the idea is that there should be another religion in the heart of one religion and the eyes of one religion should be filled with water while looking at the wounds of another. Ethnicity should not be the name of religion. The idea is that there must not be discrimination on the lines of religion, caste, creed, race, gender, etc, where women must feel safe and respected and where justice prevails, my nation bathes in nectar. Because somewhere down the line, inequality, corruption, crime, poverty, these things are ruining this rich country.
I imagine that millions of people in independent India, regardless of their religion, caste and creed will happily unite as Indians to face the crisis of the country and cut off the hands of extremists, terrorists and then what? Not only will the enemy nation not have the courage to attack us but will also think twice before looking at us with a crooked eye. Ethnicity, religion, poverty, corrupt inequality were invaded by foreigners and it continued in independent India in the same way. Because a handful of Englishmen and Mughals used their own citizens as soldiers and attacked us. And today, the same mentality raises question marks of doubt in my mind again while leading an independent India in its 75th year.
My dear Indians, look at the world with eyes wide open. Today, inability of Afghans to unite has caused them to fall victim to the Taliban militants and the massacre they are causing. Anyway, aside from all this, it is a fact that the discrepancy between the idea and the reality of this ‘Amrit Mahotsavi’ year is decreasing and that is a fact.
‘’Je na dekhe ravi, te dekhe kavi
Je na dekhe kavi, te tantradyan (technology) dakhavi’’
In a country where 75 years ago, we practised gurukul systems, wherein students lived at their gurus houses and learnt life lessons students and teachers are studying online from their homes. Even though no one imagined this scene, it has come true today, but then again, the swings of reality continue. Even today, the sin of being a female fetus occurs. From ‘What is the use of giving birth to a girl?’ to ‘We would be better off without a girl child’ the audacity of people’s mindsets have risen. The killings of an unborn child based on its gender still continue to exist even in the 75th year of our independence. Looking at the political situation in this Amrit Mahotsavi year, all the political leaders and parties are just thinking about themselves and we the commom people are seeing our hopes and dreams scatter away with our eyes wide open. But when the naive people are watching the ashes of their dreams with open eyes, they remember the poetic verses of poet Anil Kamble fondly. ‘Thoda ujed jyacha magavayas gelo, to surya hi jarasa lachaar pahila me.’ Which means that the sun that I went to ask for a little light, was found a little helpless too.
But let's not forget that in this Diamond Jubilee year, the rays of hope fell on our sports world and we won numerous gold, silver and bronze medals in the Olympics. And this is why it is safe to say that our Amrit Mahotsavi year started off beautifully. In this way, let’s hope that innumerable dreams of the idea will break the darkness of our reality and create a golden dawn so that in the centenary year of independence, such doubts and swings of reality will not be created and this is the basic concept, the basic idea.
By Shravani Kelaskar
Comentários