top of page

अळवावरचं पाणी

By Dr Snehal Gorde



तो-आज तुझा वाढदिवस आहे खरा..पण मी काहीच गिफ्ट आणला नाही.

तो जरासा नाराजीच्या सुरात म्हणाला.

ती- गिफ्ट ची गरज काय आहे पण.तू आहेस की.

तो- मला माहीत आहे तुला गिफ्टस् किती आवडतात ते.पण मला काहीच सुचलं नाही.काय घ्यावं ते कळलं नाही.




ती- मी मागू तुला गिफ्ट? देशील?

तो- माझ्या आवाक्यात असेन तर नक्की.

तिने त्याचे हात स्वतःच्या गालावर ठेवले आणि म्हणाली एक छान शी smile दे.

तिच्या या वेडेपणाचे त्याला ही हसू आले.त्याने ही एक छान मोठी smile दिली.तितक्यात जोरात पाऊस सुरू झाला..

ती - अरे वाह!! तुझ्याबरोबर पाऊस पाहायचा होता.तोही मस्त पडतोय.समोर तू इतकं गोड हसू घेऊन आहेस..मी तुझ्या समोर आहे.अजून काय सुंदर गिफ्ट असेन वाढदिवसाचं.तिच्यापुढे हतबल होत त्याने आपले बाहु आलिंगणासाठी पसरले..मोठ्या आतुरतेने ती त्याच्या मिठीत शिरली .हाताची मिठी न सोडवता त्याच्याकडे बघून म्हणाली हे अजून एक मोठं गिफ्ट.त्यावर तो पुन्हा तितकाच गोड हसला .

"कुछ तो बात है तुम्हारी मुस्कुराहट में ,

वरना ये मुल्हिद उसमें खुदा ना ढूंढ़ता!"

वेडी आहेस तू..तिला पुन्हा मिठीत घेत तो म्हणाला..

तीच मिठी अजून घट्ट करत ती म्हणाली हो..तुझ्यासाठी .

एखादं नातं अळवावरच्या पाण्यासारखं आहे, हे माहीत असून ही माणूस त्यात का इतका गुंतत जातो?

दोन्ही भिन्न..पण एकत्र आल्यावर किती सुंदर दिसतं.. माहीत आहे हे असं राहणार नाही..हे क्षणभंगुर आहे..पण तरीही त्यातलं सौंदर्य जपता आला पाहिजे.. नात्यातला ओलावा टिकवता आला पाहिजे.इतकी माणसं येत जात असतात आपल्या आयुष्यात..तरी काही खास व्यक्तींच्या आठवणी का येत असतात?कारण ती माणसं अळवावरच्या पाण्यासारखी जपलेली असतात.त्याच्या मागच्या भावना तितक्या खोल असतात.

.....त्याच्या मिठीत ती इतकी हरवून गेली की तिचा पाऊस पाहायचा राहून गेला.



By Dr Snehal Gorde




6 views0 comments

Recent Posts

See All

The Phantom Pursuit

By Lakshmi R Menon The evening sky was afire with streaks of orange and crimson as Maya crouched behind the crumbling wall of the...

Call Of Midnight

By Dhruti Shah The endless expanse of shimmering darkness lies deep in the heart of eternal night. An endless dark void towering her lair...

Corridors of Darkness

By Dhruti Shah A girl dressed in affluent uniform stood amidst the endless corridor of darkness staring at what seemed like infinity to...

Comentarios

Obtuvo 0 de 5 estrellas.
Aún no hay calificaciones

Agrega una calificación
bottom of page