top of page

चल निसर्ग बनू

Updated: Feb 5, 2024

By Amol Kharat


तुझं निसर्ग प्रेम दिसतंय मला आणि तेवढीच ते जपण्याची तळमळ. आणि तु हे स्वीकारताना ही दिसतेय की तू एकटी त्याला जपु शकणार नाहीयेस…आणि म्हणुनच तुझी तळमळ होतेय…दिसतेय मला. हे मुके झाडं…. वारा…पाणी…. प्राणी…पाखरं….सगळेच सजीव ज्याचं मुके पण डोलात घेऊन तरंगणाऱ्या निळ्या शार पृथ्वीचंही मुकेपण संपवताना, तिची भाषा होताना तू मला दिसतीये…. पणना तुझी ही भाषा मला थोडी माणसाळलेली दिसतेय….बघ ना…तोडू देतात झाडं स्वतःला…टाकू देते घाण स्वतःत नदीही …घेतं आभाळ मिठीत सगळ्या प्रकारच्या धुराना…आणि अवकाश तर सामावून घेतय सगळ्याच ध्वनीना…आणि रात्र बघ ना किती उजेड सोसतिये. अगदी स्वतःचं असणं संपेपर्यंत. सुंदर आहे ना आपली पृथ्वी आणि तेवढीच प्रेमाने ओथंबलेली….कीटक पाखरांपासून तर अगदी आपण माणसांपर्यंत… तिचं प्रेम प्रेमचं असणारे …बाकी सगळेच जीव आपला वंश टिकवण्यासाठी धरपडत आहेत आणि असेल या पृथ्वीच्या प्रेमाच्या वातावरणात..आकाश,अवकाश, हवा, झाडं, माती आणि पाण्यात..आणि हेचं वातावरण दूषित होतंय हेच तुला खुपत नाहीये ना…?

तुला स्वच्छ श्वास..पाणी मिळावं तसं या जीवनाही मिळावं यासाठीचं तुझी तळमळ आहे ना? मला माहितीये तू तुझ्या बालपणात हे सगळं स्वच्छचं अनुभवलं आहे….आणि सगळं स्वच्छचं अनुभवताना तू निसर्गाला ही पाहिलं आहे ….आणि आता तुला या दूषित वातावरणात निसर्ग माखलेला…आणि अपंग झालेला दिसतोय…आणि संपताना दिसतोय…तुला काळजी आहे वातावरणाची. अशी काळजी मला का नाहीये अस वाटतं ना तुला?...मी सांगू…. मी ना हे दूषित वातावरण करणाऱ्या मधला स्वतःला समजतच नाही…मी या झाडांवर…आभाळावर…डोंगरांवर प्रेम करता करता त्यांच्या सारखाच झालो आहे…मुका. मला या दूषित वातावरणा साठी कोणावरच रागवता येत नाही. उंदीर खाणाऱ्या सर्पाला…गरीब जीवांची शिकार करणाऱ्या हिंस्र प्राण्यांवर मला कसा राग येईल? राग येणं हे माणूसपण आहे तर त्यावर नियंत्रण करणं याच झाडा पानानां कडून शिकतोय मी. स्वीकारतो या प्रत्येक जीवाला त्याच्या सुरक्षेसाठी मिळालेल्या त्या प्रत्येक  ताकतीला अगदी माणसाच्या विचार ताकतीलाही…. प्रत्येक जीव त्याची ताकद स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरतो. पण माणूस तेवढा सुरक्षितता ओलांडून सुविधा पूर्ण आयुष्य घडवताना, इतर जीवांच्या सुरक्षेवर अणि सुविधेवर घाव घालताना तुला तो निसर्गाचा शत्रू दिसतोय, दिसु दे, पण मला काय दिसतंय सांगू ? ही माणसाची शक्ती पिसाळलेल्या हत्तीच्या शक्ती सारखी दिसतेय…जी निसर्गाचा नाश करील, पण संपवू शकणार नाहीये. निसर्ग स्वतः ला वाढवतो, विस्तृत करत असतो, अफटता गाठत असतो सतत. तो बदलत असतो, बदलवत असतो पण संपत नसतो.



सर्पा चे विष इतर प्राण्यांना संपवू शकते, पण ते त्याच्या सुरक्षेसाठी आहे. याच विषासारखी इतर प्राण्यांना घातक माणसाची बुद्धी असेल. पण ती स्वतःच्या सुरक्षेच्या पुढे जाऊन स्वतःनिर्मित सुविधेकडे जाताना दिसतीये…खरतर हा मोह आहे, किंवा गर्व स्वतः च्या तकतीचा, किंवा मग नुसताच स्वार्थ…ज्यात माणूस होणाऱ्या निसर्गाच्या नाशाकडे उघडपणे दुर्लक्ष करत आहे, करु देत दुर्लक्ष. पण तुला माहितीये का तुझ्या सारखे खुप लोकही आहेत, हा समतोल राखण्याच काम निस्वार्थ पणे करत आहेत. हा निसर्गाचा विचार आहे, निसर्गातूनच आलेला आहे. माणूस काय आहे ? निसर्गच ना? एक साप विषारी असतो अणि एक साप शेतकऱ्यांचा मित्र ही असतो…..पण असावा एक भाव प्रतकाच्या मनात…निसर्ग प्रेमभाव, एक कृतज्ञभाव, एक संवेदना अणि ही संवेदनशीलता आपण जपुया, यात खूप ताकत आहे, अगदी पिसाळलेल्या हत्तीच्या ताकतीने होणाऱ्या नाशा पेक्षा जास्त, तो झालेला नाश भरून काढणारी एक अफाट ऊर्जा…..अणि ही ऊर्जा न संपणारी आहे…याच निसर्गासारखी अफाटच….तू संवेदनशील आहेस आणि ही आत्मिक ऊर्जा खुप पसरत आहे याच निसर्गात ….आपल्याला निसर्गाचा ऱ्हास दिसतोय बदल दिसतोय…हा एक बदलातील टप्पा असेल तुझी इच्छा आहे ना, सगळं स्वच्छ अणि स्वच्छच ऊर्जेत असावं अगदी तसच असेल सगळी पृथ्वी स्वच्छ, उर्जित, अणि ताजीतवानी…थांब जरा निसर्ग ही कात टाकतो. तो पर्यंत आपण आपली संवेदनशीलता जपुया.. स्वार्थी भांवडांचा स्वीकार करत, त्यांच्यातला निसर्ग बघत, प्रेम करत……आपला वेग संथ असेल कदाचित पण त्या वेगाला अंत नसेल…..मधमाश्या पाळू, झाड लावू, पाणी घालू, मुक्या प्राण्यांना भरवू, जंगलं जपू, पाणी वाचवू, आपण निसर्ग बनू….देत राहू… मुंगी बनू अणि मुंग्या जनु………


By Amol Kharat



2 views0 comments

Recent Posts

See All

Healing

9 to 5

Can't Cry

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
SIGN UP AND STAY UPDATED!

Thanks for submitting!

  • Grey Twitter Icon
  • Grey LinkedIn Icon
  • Grey Facebook Icon

© 2024 by Hashtag Kalakar

bottom of page