By Shital Rahul Dusane
तू दूर जाता माझा ,जीव कासावीस झाला
विरहात तुझ्या सजणे,हा श्वास रोखला गेला
पाण्याविना माश्याचा,जसा जीव तडफडला
तुजवीण सखे माझ्याही,प्राणातून प्राण गेला
तुझ्याविना जगण्याचा, प्रयोग माझा फसला
सांग असा माझा, अपराध काय होता झाला?
अश्या अचानक वेळी, सोडून मला तू जाता
क्षणभर ही का तुला, माझा विचार ना आला
तुझ्या आठवणींत रमण्याचा,यत्न खुप केला
बोलायला घडीभर संगे,ना इथे वेळ कुणाला
तू होतीस इथे जोवरी, घरं हे गोकुळापरी सजले
अग्नित विलीन तू होताना, देह माझा जळत गेला
तू जाता मी इथे हरदिनी,घटका मोजत आहे
बोलावणे कधी येईल मला ही,वाट पाहत आहे
दे यमास निरोप माझा, सांग लवकर घेऊन जाया
पुन्हा एकरूप होण्यास , प्राण कंठात थांबला आहे
By Shital Rahul Dusane
Nicely done
Chan
Hearttouching Poem... Superb 👍
👍🏽👌👌👌
Simply nice.