By Shital Rahul Dusane
परिस्थिती बदलता, सारे बदलत गेले
निर्णय चूकता हातातले, सारे निसटत गेले
मुखवटे उतरले सारे, मग खरे चेहरे दिसले
मागे मागे करणाऱ्यांनी, सलाम लांबून ठोकले
एका अर्थी बरेच झाले, परिस्थिती बदलून गेली
माणसातला माणूस ओळखण्या,मला शिकवून गेली
बेफाम उधळा घोडा माझा, त्याला लगाम लावणे जमले
पुन्हां उभा राहण्या सज्ज, मी स्वतः लढाया शिकले
मेहनतीला पर्याय नसे इथे, असे कष्टाला वाव
परिस्थिती बदलता तुमची, होई रंकाचा ही राव
आज कवडीमोल जे बाजारी,उदया तयाला भाव
दोष नसे परिस्थितीचा, तीने धडा शिकवला राव
By Shital Rahul Dusane
👌
Nice poem Shital
Sundar Kavita 👌
Vastavvadi Kavita... Great 👍
Very nice.