By Kaustubh Rajendra Dherge
ना मी पाहिले, ना तुम्ही पाहिले, हे भविष्य ।
ज्याच्याच चिंतेत सरून जाते अर्धे आयुष्य ॥
ज्याला सुरक्षित करण्यासाठीच सतत झटतो प्रत्येक मनुष्य ।
आजवर कुणीही करू शकले नाही यावर अचूक भाष्य ॥
खडतर असतात वर्तमानाचे अनेक निर्णय, ज्यांनी सुकर होते भविष्याची वाट।
आयुष्याला कलाटणी देऊन जाते चांगल्या-वाईट प्रसंगांची एकच लाट ॥
संकटे, अपेक्षा, आशा-निराशा हे आहेत भविष्याचे आधारस्तंभ ।
आयुष्याच्या ध्येयातूनच होतो चांगल्या गोष्टींचा शुभारंभ ॥
वर्तमानातील कृतींवर निर्भर असतात तुमच्या
भविष्यच्या कथा ।
त्यामुळे आजच कामाला लागा, कोणालाही न सांगता तुमच्या भूतकाळाची व्यथा ॥
By Kaustubh Rajendra Dherge
Comments