By Kaustubh Rajendra Dherge
आकाशात उत्तुंग अशी झेप घेण्या स्पुर्थी देतात त्या भावनाच असतात,
अपयशी ठरलो तरीही जगण्याची दिशा पुन्हा दाखवतात त्या भावनाच असतात
भावनाच असतात ज्या मनुष्याला योग्य अशी वाट दाखवतात,
भावनाच असतात ज्या जगण्याची नवी उमेद जागवता
भावनाच असतात ज्या मनुष्याला एकमेंकाचे शत्रू बनवतात,
भावनाच असतात ज्या मानुसकी चा धर्म जपण्यास मदत करतात.
भांडण झाल्यावर देखील काळजी करणाऱ्या त्या भावनाच असतात,
आनंदी असतानादेखील डोळ्यात अश्रूआणतात त्या भावनाच असतात
व्यक्त होतात ज्या भावना त्या आयुष्यभरासाठी आनंद देऊन जातात,
अव्यक्त भावना आयुष्यभरासाठी मात्र कधी दुःखांचा डोंगर तर कधी अस्वस्थता देऊन जातात
By Kaustubh Rajendra Dherge
Kommentare