By Nandita Bondre
माझे मन तुझे झाले,
पाहता पाहता हळवे झाले,
अलगद ओंजळीत सावर तयास,
तुटण्या इतुके नाजूक झाले
माझे मन तुझे झाले,
माझ्याविना तुझे झाले,
भेटण्याची आस लावून मनाला,
तुझे होण्या आतुर झाले
माझे मन तुझे झाले,
भिरभिरूनी, अस्थिर झाले
मनाला शोधत राहिले गिरक्या घेत,
पण माझे मन तर आता तुझे झाले..
By Nandita Bondre
Comments