By Atharva Arvind Andore
आईच्या गर्भापासून मरणोत्तर दिसणार्या स्वर्गापर्यंतचा प्रवास म्हणजेच तर आयुष्यं असतं. लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत, अंधांपासून बहिर्यांपर्यंत, मानवापासून प्राण्यांपर्यंत आणि आईपासून त्या भगवंतापर्यंत सामावलेलं आणि सामावणारं असतं ते आयुष्य. ह्या आयुष्यात सुखांबरोबर दुःखही असतंच की. खरंतर सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर आयुष्य हे सचिनच्या फलंदाजीसारखं असतं. चौकार आणि षटकारांच्या आनंदात असणार्या याच आयुष्यात कधी दुःखाचे चेंडू सोडूनही द्यायचे असतात. इथे शतक मारणं गरजेचं नसतं तर आपल्या खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं असतं. गोलंदाजांसारखे लोक येत-जात राहतात पण आपण मात्र टिकायचं असतं. आयुष्यात हार-जीत होत असते पण या पराभवासमोर कधी हरायचं नसतं. आयुष्य हे रोज थोडं जगायचं असतं. ते कधी इतरांसाठी जगायचं असतं तर कधी स्वार्थी बनायचं असतं. एकमेकांच्या जीवावर उठलेल्या या माणसांच्या गर्दीत ह्या माणसांसाठीच थोडं माणूस बनायचं असतं.
By Atharva Arvind Andore
😇
Nice .
Best
Good