top of page

माणसातला सिंह

By Amol Kharat


तु वाघीण अणि मी सिंह होतो,आजूबाजूला गर्द हिरव्या अगदी काळपट रंगात सजलेलं जंगल …अंगावर खेळणारा गार वारा अणि रोजच्याच आवाजांचं आज नवं संगीत हळुवार कानातून आज मनभर विरत होतं. गव्हाळ रंगाच्या प्रकाशात दिसणारे रोजचेच पानं, गवताच्या काड्या, माती अणि रोजचीच तु पण आज नवीच….. तू आज माझ्याकडे बघून तुझ्या सौंदर्याच्या अदा सादर करण्यात जितकी तल्लीन होतीस तितकाच मी तुझ्या सौंदर्यावर स्वतःच सिंहपण लुटायला उर्जीत होत होतो,...तुला स्पर्धा होती, एका बिबट मादीची अणि तिथं जवळ नसलेल्या सिंहणीची पण तुझ समर्पण मला सगळ्या जंगलाचा विसर घडवून आणत तुझ्यावर खेचतचं होतं…अगदी मला तुझ्यावर लुटवयला मी तयार होत होतो….मी, माझ्या आयाळा सहित तुझ्यावर तुटून पडलो…….. तुझ्या मासल, सुंदर अणि उबदार शरीरावर मी स्वतःला वाहवू लागलो…..…तूझ्या मानेत घुसून तुझ्या छातीपर्यंत अणि छाती पासुन तूझ्या कानापर्यंत मी फक्त माझ्या श्वासांनसोबत तुझाचं होऊ बघत होतो.…मी एकातून शून्याकडे जात होतो तुझ्यातच घुसत होतो…..या शुन्यतेच्या प्रवासाच्या मंद वेगासोबत स्वतःला जुळवत होतो……. वेगही जनु विरत होता….माझ्या आतून मोठ्या आवेशात, जणू  शून्याच्या आतल्या उद्रेकाचं द्वंद….भलत्याच ऊर्जेने, माझ्यातून तुझ्यात शिरत मला मंद करत होतं.……. मी अगदी शरीर शून्य होऊन फक्त धन्य होत होतो. ….तुझ्या शरीराच्या उबेने माझ्या आतली ऊब खेचली होती…आता तूही माझ्यासहितच फक्त मंद होत होती….मी वाऱ्याच्या झुळेकवर अलवार जणू तरंगत होतो…अणि तुझ्या लयीत एकरूप होत होतो……मी तुझा अणि तु माझी आता फक्त दोन शरीरात उरलो आहे….एकमेकांना पुरायचे सप्न रंगवण आपण आता सुरू केलं आहे…..तु मला आता एका मानवी स्त्रीच्या रुपात दिसत होती अणि मी मानवी पुरुषाच्या डोळ्यातून तुझं रूप बघत मानवी मेंदूने तुला जिंकण्याचा परत एकदा प्रयत्न करू लागलो, मानवी पुरुष रुपात… स्वप्नाची जणू रात्र उरकली..अणि मी उरलेलं, डोक्यात घोळलेलं स्वप्न घेऊन दिवसाचं तुला शोधू लागलो. तु सहज सापडलीस मला पूर्वा, एका सुदंर नैसर्गिक भागात जिथं फक्त माणसं राहतात, फक्त पाळीव प्राणी सोबत ठेऊन. तुझं त्या नैसर्गिक सुंदर गावी कुत्रा अणि मांजराचा सहवास असलेलं तुझचं घर शोधण मला फार सोपं गेलं, मी पोहचलो प्रवास करत…तुझ्या भेटीच्या कल्पना उरावर पेरत…तुला प्रत्क्ष्यात पहिल्यांदा बघतोय मी पूर्वा,तुझं सौंदर्य परत एकदा… या मानवी स्त्री सुदंर रुपात…तूच सौंदर्य आहेस… तुला या माणसाच्या आवाजात पहिल्यांदाच आईकतोय….आधी कधीही आईकल नव्हतं पूर्वा…..मला तुला स्पर्श करावा वाटतोय, पण आधी तुझ्या मानवी आवजातल्या बडबडीचा कानावर स्पर्श अनुभवू दे…….मला तुला आईकायला छान वाटतंय….तुला अनुभवताना मी मानवी शरीरातून तुला नव्याने जगतोय….हे तुझ सगळं माझ्यासाठी अदा सादर करणच आहे…मी आता तुझ्यासोबत, तुझ्या गावात मला माहीत नसलेल्या जागी तुला नव्याने जाणून घेऊ बघतोय….तु मला घेऊन जाते आहेस..तु जिथं जिथं असतेस तिथं. मी फक्त तुझ्यासोबत तुला अनुभवत आहे….तुझ्या या रचलेल्या जगात. तु म्हणतेस मीच तुझं जग आहे..मग हे काय रचून ठेवलंय पूर्वा? ….असो, पण हे घर छान आहे…कापडी घर..पहिल्यांदाच बघतोय..अणि तेही इतकं भक्कम अणि भव्य. दगडी विहरी…आड. तु हे दाखवताना आधी पोहायच का तुला? असा प्रश्न तु विचारला…तु प्रश्न का विचारतेस मला कळत नाही..मला ही आउपचारिकता नकोय गं, मीही उत्तर देत नाही म्हणालो मग तुला. पूर्वा, तुला मानवी रुपात खूप आढेवेढे घेताना बघतोय मी…. तू थोडी दूर असलेली दोतियेस मला ….हे तुला न सांगता, मनातच ठेवून मी, तु दाखवत असलेलं तुझं जग मोठ्या विश्वासाने बघतोय…अणि तु मला तुझ्या गोष्टी दाखवता दाखवता काही लपवतियेस जणू. मला एका दरवाजा बाहेर थांबवून,तु आत एकटीच जाऊन तुझ्या मांजरींशी बोलततीस….बोलताना तुझा बाहेर येणारा स्पष्ट आवाज आईकत अणि तु मला ते मांजर दाखवायला का नेलं नाही या प्रश्नात मी आजूबाजूच्या सर्व माणसांकडे भीतीने बघत मी तुझी बाहेर येण्याची वाट बघततोय. माहीत नाही या मानवी मेंदूत ही भीती कुठून आलीय…मला तू या विहिरीत पोहयच का विचारलं होतं ती विहीर मी आत्ता परत एकदा एकटा बघतोय अणि मला भीती वाटतेय ती विहीर बघत..नको, मी परत तूझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित केलं… तुझा मंजरांसोबतचा संवाद बंद झाला....आजूबाजूला येणारी जाणारी माणसं आहेत, ही माणसं येता जाता मला मी नवीन आहे म्हणून बघत आहे, मला कळतंय…पण मला ते भीतीदायक माणसं काहीच विचारात नाहीये…. कदाचित त्यांना महितिये मी तुझ्यासोबत आहे…तुझी दहशत जाणवतेय पूर्वा इथे…., पण ही येणारी जाणारी माणसं तुझ्या गालावरून हात का फिरवत आहेत अणि तु का त्यांना ते करू देत आहे पूर्वा..? 



तुझ्या गालावरून हात फिरवताना ही माणसं मला दुर्लक्षित करून पुढे जात आहेत…..तु वैश्या आहेस पूर्वा…अणि तु मला या वैश्याखण्यात आणलयस…...तुला बहुतेक तुझ्या काही गोष्टी या मानवी भाषेत सांगता येत नाहीये..अणि तु मला म्हणूनच बहुतेक ते दुरुन दाखवण्याचा प्रयत्न करतीयेस..पूर्वा नको करू असे प्रयत्न..मला काही फरक पडत नाहीये या तुझ्या गोष्टी जाणून घेऊन.. तु पूर्वा आहेस हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे..पण तुला हे महत्व कळत नाहीये…..मी त्या दारातून आत येण्याचा विचार करतोय पण मला आतही भीतीदायक वातावरण दिसतंय..ते एवढ्यासाठीच की मी वैश्या खाण्यात कधीच गेलो नाहीये. तुझा तो व्यवसाय… असो, मानवी व्यवसाय आहे…तुझी या वेष्याखाण्यात दहशत आहे ती तुझ्या सौंदर्याच्या जोरावरच…मला तुझ्याशी एकांत हवाय पूर्वा. पण तू निवांत होतच नाहीयेस….पूर्वा तु बाहेर येत नाहीयेस अणि मी तुझीच वाट बघतोय तुझ्या गावी येऊन,... अणि आत्ता तु मला आत बोलवायला पाठवलेल्या तरुणाकडून निरोप मिळाला…..आलोच पूर्वा..मला माहितीये तु आपली भेटण्याची ,निवांत असण्याची जागा सजवत असणार….म्हणून तु मला बाहेर थांबवलं…त्या तरुणाने मला फक्त दिशा दाखवली…मी मुख्य दारातून आत येऊन तु दिसतेस का बघतोय…इथे तु दिसत नाहीयेस..पण एक गंध येतोय कुठून तरी … पूर्वा तुझ्या अदा एकांतात बघायला मी आतुर आहे, त्या दरवाजा च्या आत तूच आहेस… मला फुलांनी सजवलेल्या खाटेवरून, सगळी कडे शिंपडलेल्या अत्तराचा मुग्ध करणारा गंध तुझ्या खोलची वाट दाखवत आहे….पूर्वा..मी कधी पोहचेन तुझ्या जवळ..तुझ्या खोलीत…मी चालतोय पण जणू माझा वेग आता त्या गंधाच्या वेगात मिसळलाय..माझा वेग मंद झाला..नाही नाही…सगळच मंद झालंय पूर्वा…माझा श्वास…. हवेचा प्रवाह…माझ्या चालण्याचा वेग..माझ्या विचारांचा वेग सगळचं.  तु पसरवल्या गंधाच्या प्रवाह वेगाशी एकरूप जणू….पूर्वा मी तुझ्या दाराजवळ पोहचतोय..हो पोहचतोयच…अजून दोन पावलं दूर आहे फक्त…हे दोन पावलं कापताना मी न दिसणाऱ्या अत्तराच्या प्रवाहात जणू पूर्णपणे स्वाधीन झालो आहे, पूर्वा माझं पाऊल पडण्यासाठी लागणारी ऊर्जा तुझ्या अत्तराच्या वेगाच्या लयीत एकरूप झालिये…मी दाराबाहेर पोहचलोय पूर्वा…. मी दारावर थाप मारण्यासाठी माझा हात उचलतोय पूर्वा…मी आता फक्त उभा आहे, अणि माझी उर्जा माझा हात उचलत आहे…पण तू थाप मरण्याआधीच दरवाजा उघडायला येऊन थांबलीयेस….मला आतून कडी उघडण्याचा आवाज येतोय तोही खूप मंद वेगात……अणि तूही मंद वेगात दरवाजा उघडत आहेस…मला आत खोलीत मंद उजेड दिसायला लागला आहे…हा दरवाजा उघडण्याचा वेगही गंधाच्या वेगासारखाच मंद आहे…अणि माझी आतुरता फक्त त्या आत्तरासारखी…. बंदिस्त पण बेभान दरवळ. दरवाजा उघडतो आहे…तुझे हात दिसताय मला..नाजूक हात..अणि त्यावर गोलाकार तुझ्या मनगटाला सजवणाऱ्या बांगड्याही दिसत आहेत, जनु त्या बांगड्या  हळुवार, अत्तराच्या गंध प्रवाहाच्या मंद वेगात एकमेकांवर आदळत अणि सूक्ष्म संगीत बनवत माझं स्वागत करत आहे…मला आता तुझ्या चेहर्याकडे बघायचं आहे…दोन्ही दरवाजे तुझ्या दोन्ही हातानी उघडत आता मला  तु दिसायला लागलीयस….तुझे काळेभोर केस..अणि गालावर आलेली लयदार बट…आह….पूर्वा..हे मानवी स्त्री रूप …मी तुझे डोळे माझ्या प्रेमात डूबलेले बघतोय पूर्वा…हेही असतं मानवी रुपात..वा….पूर्वा..तुझे गाल..तुझे ओठ, तुझ्या बोलक्या भुवया…अणि तुझं त्या अतराच्या गंधाच्या वेगात गालावर दिसणार गोड हसणं…पूर्वा..पूर्ण दरवाजा उघडून तु मला आत बोलवत माघे सरकत आहेस…एक एक पाऊल मागे घेत तु माझ्या डोळ्यात डोळे गुंतवले आहे जणू,..पूर्वा तु लाजून नजर हटवलीस…वा…हे मानवी लाजणं…आह…माझी नजर जणू मुक्त झाली तुझ्या डोळ्यातून आता. मला आता तुझी नाजूक  मान दिसतीये..…उघडे खांदे..… कपडा नसलेली उघडी छाती दिसत आहे…पूर्वा……..अणि अचानक हा अत्तर प्रवाह मंद वेग झटकन बंद झाला… अणि अत्तराचा गंध ही मंद प्रकाशाच्या खोलीत प्रकाशाच्या वेगाने गायब झाला…पूर्वा..तु स्त्री नाहियेस ? तुझी छाती पुरुषी आहे? तु तृतीयपंथी आहेस ? तु एवढ्या सहज हो म्हांतियेस? अणि तु हे का लपवलं पूर्वा ? माझ्यात भिनलेले अत्तर उतरून या प्रश्नाचं माझ्यकडे नसलेलं उत्तर माझ्यात कालवा निर्माण करत आहे पूर्वा…तु बोलत का नाहीये? परत प्रश्न…मी या प्रश्नांच्या गरक्यात फिरतो आहे ….मला शांत व्हायचंय पूर्वा…..तु ये फक्त एकदा जवळ अणि मला जवळ घे पूर्वा….पूर्वा आलीस तू जवळ मला मिठीत घेतलंस….मला खरच शांत वाटतयं…मी या मानवी गोष्टीतून हळू हळू मुक्त होतोय पूर्वा….मी शांत होतोय…तुझ्या शरीराचा स्पर्श माझ्या मनभर शांतता आणि उत्तरांचा शिडकाव करत आहेत…मी शांत होतोय अणि मला पडलेले प्रश्न मानवी आहेत मला कळतंय आता…

असो…मानवी गोष्टी आहेत या अणि तुझं हे लपवून ठेवणं ही मानवी…पण मला तू मानवी स्त्री अणि पुरुषी रुपातही सुंदरच आहेस..माझी पूर्वा तु, तुझं सौंदर्य सदोतीत आहे…..अणि आपलं असणंही सदोतीत..असो, चल आपण आपल्या जंगलात जाऊ पूर्वा…पूर्ववत होऊ….का थांबवतियेस मला ? 


किती बोलतोस तु राजा? मनातच सगळं. शांत हो अजून, मी तुझी पूर्वाच आहे. मी या मानवी मेंदूतला माझा सिंह बघण्याचा प्रयत्न करत होते, अणि दिसला मला तो….तूच माझा सिंह आहेस अणि मी तुझी वाघीणच….हे पुरुषी छाती दिसणारी वेशभूषा करून तुझ्यावर मानवी विचाराच्या झालेल्या परिणामाची पातळी बघत होते…मी इथ वैश्या होऊन मानवी पुरुष समजून घेण्याची शिक्षा भोगते आहे….अणि प्रत्येक क्षणाला तुझीच वाट बघत होते, तु सहज शोधलं मला राजा, पण मी तुला सहज कशी स्वीकारू? तू मानवी पुरुषी रुपात भेटतोय…. अणि मी जगणारे अणि माझ्याकडे येणारे पुरुषांच्या पुरषपणामुळे मला तुझ्या पुरुषपणावर संशय येणं साहजिक नाहीये का? पण तू तुझं सिंहपण या मानवी पुरुषी रुपात ही जपतो आहेस…तूच माझा सिंह .. माझा राजा…शांत हो. मला सांग, तुझा या मानवी शरीरात व्यवसाय काय आहे राजा?  मला समजतंय पूर्वा, तु माझी परीक्षा घेत होती, तु हा व्यवसाय करतियेस, तुझ्याकडे येणारे पुरुष एक सारखे असू शकतात..पण तुझ्याकडे न येणारे पुरुषही पुरुषच असतात..तु तुझ्या चौकटीतून पुरुष बघतियेस अणि मी तुला आपल्याच जंगलातून. 

हो राजा,  मला दिसतय आता. पण तुझा या मानवी रुपात व्यवसाय काय आहे राजा? पूर्वा मी लेखक आहे.. वा, माझा सिंह लेखक…काय लिहतो तु राजा ?

या मानवी रुपात अहिंसा लिहत आहे…….


By Amol Kharat




2 views0 comments

Recent Posts

See All

"Echoes of The Inner Battle"?

By Riya Singh Inner Self: The storm has begun. Do you feel it? The world is roaring around us, calling us to rise. Today is the moment of...

The Wake-up Call

By Juee Kelkar When the silence slowly engulfed the noise as the sun grew dull in the village of Sanslow, a little girl, accompanied by...

Act

By Vidarshana Prasad You are the main act.    We are put on the stage before we know it. It's too late to realize that we've been there...

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page