By Aditi Kothavade
जिवाला जीव देणारी,
अशी ही मैत्री,
तुझं माझं जमेना,
तुझ्यावाचून करमेना,
अशी ही मैत्री,
एकमेकांना साथ देणारी,
अशी ही मैत्री,
कठीण प्रसंगात धावून येणारी,
अशी ही मैत्री,
पाण्यात रंगासारखी मिसळून जाणारी,
अशी ही मैत्री,
रक्ताच्या नात्यापेक्षा अतूट बंधन असणारी,
अशी ही मैत्री,
एक दुसऱ्याची खोड काढणारी,
अशी ही मैत्री,
चुकल्यास हमखास रागवणारी
शिव्या घालणारी,
अशी ही मैत्री,
आपले लक्ष साधण्यास हिम्मत देणारी,
अशी ही मैत्री,
गरज वाटल्यास आपल्यासाठी
राडा घालणारी,
अशी ही मैत्री,
माळेतील सुंदर गुंफण असणारी,
अशी ही मैत्री,
गाण्यातील सूर असणारी,
अशी ही मैत्री,
आकाशातील ध्रुवताऱ्यासारखी
अटल राहणारी,
अशी ही मैत्री,
आपुलकी आणि जिव्हाळा असणारी,
अशी ही मैत्री
मैत्री व्यक्त करण्यास
जे काही बोलावे ते कमीच
कारण मैत्री ही व्यक्त होत नसून
फक्त आणि फक्त
अनुभवास येते
अशी ही मैत्री
By Aditi Kothavade
Comments