By Shital Rahul Dusane
कमनीय बांधा तिचा, सजला ओठांवरी तीळ
घायाळ करे गालांवरी उडता, अलवार केसांचा पिळ
केशसंभार सावरीत, ती अशी समोरून जाता,
धडधड वाढे हृदयाची, कसेलच भान ना आता
चापून नेसल्या साडीने, सौंदर्य अधिकच होते खुलले
किती दिलफेक आशिकांचे,काळीज तिने चोरले
श्वास रोखून घेई जो तो , तिने नयनबाण मारता
स्वर्ग लोकीची अप्सराही फिकी, तिचे गुण गाता
पाहुनी तिला मन फुलून जाई,फुटुनी मोरपंख
हसणे तिचे घायाळ करी, तिचा नखरा मारी डंख
अस्मानी त्या सौंदर्याला ,कित्येक होते भुलले
हास्यामागे दडलेले अश्रू मात्र, कोणा नाही कळले
हुंदक्यांचा आवाज,पायीच्या पैंजणात विरघळला
सांगेल कोणा कर्म कहाणी, जो तो चमडीचा भुकेला
आंधळ्या त्या लोकांना ना दिसती , तिच्या अंतरीचे घाव
स्पर्शास आसुसलेल्याला, कसे सांगेल मनीचे भाव
चेहऱ्यावरती रंग चढवीत, लावण्यवती साजिरी झाली
अश्रू लपवीत हास्यामागे,पुन्हा नयनबाण मारून गेली
By Shital Rahul Dusane
👌
अप्रतिम
Apratim...
Nice 👌🏻
👌