By Nikhil Datar
शिरी घेऊनिया झंझावाता एकाग्रे ध्येयास स्मरुनी पथ खुंटले परतीचे आता न पाहणे मागे फिरुनी...धृ
वाट असो कितीही बिकट करू जिद्दीचे अभेद्य कोट आले घोर अघोर संकट तरीही पिऊ विषाचे घोट कोसळले आभाळ भलेही उभे राहणे पाय रोवूनी पथ खुंटले परतीचे आता न पाहणे मागे फिरुनी...१
झाले आघातांवर आघात तरी झेलू सारे हातोहात ओलांडून बाधांचा प्रपात शत्रूंचा साऱ्या करु निःपात कार्याचा नित्य चेतवू वन्ही ऊन वादळे थंडी सोसुनी पथ खुंटले परतीचे आता न पाहणे मागे फिरुनी...२
अखंड राखण्या ही संस्कृती राजगडाची साक्ष पुरेशी सांगे सुवेळा नि पद्मावती गाथा अजेय वीरांची खाशी रणात विजयी वीरांची तू अमृत प्रदायी संजीवनी पथ खुंटले परतीचे आता न पाहणे मागे फिरुनी...३
...२
...२...
देई श्रांत जीवास विश्रांती या कडेकपारीचा एकांत देई ध्वस्त मना चिरस्फूर्ती शिखराचा भगवा अविरत अनमोल महत्त्व त्यागाचे कधी न जावे विस्मरणी पथ खुंटले परतीचे आता न पाहणे मागे फिरुनी...४
By Nikhil Datar
✨🤩
प्रेरणादायी
Best
खुप सुंदर ❤️👌