top of page

स्वप्नसंग्रह

By Amol Kharat


झोपेच्या उबेने मारलेल्या चिमुकल्या पहाटेच्या,सकाळपर्यंत सुटलेल्या सुतकानंतर मी जागा होतो……. सकाळ संपलेली असते……….

मग मी जागा झाल्यावर त्या आठवू लागलेल्या स्वप्नांना आठवत त्यांच्यावर हसतो…….

रात्रीच्या अंथरुणात मावत नसलेले माझे तरुण स्वप्न… अपऱ्या चड्डी शर्टात मिरवत असते….. मग ती निरागस रात्रही त्या निरागस स्वप्नावर हसते…..

 ……..जणू,   ती रात्रच मोठी होत नाहीये…. स्वतःच बालिश पण माझा पिच्छा करणाऱ्या स्वप्नांवर उधळवत आहे…..



त्यातच माझं स्वप्न ही स्वतःला सजवत ,स्वतःचं गाणं वाजवत …..नाचत असतं. स्वतःचे रंग घेऊन दिवस दिवसाचे आकार रचत असतं….. खरं तर ते निर्माता होत असतं…… झोपेतच संपून माझ्या उबेत उरतं असतं….. ही उब माझ्या स्वप्नांनीच झोपेच्या पोटात सोडलेला गर्भ आहे जणू…… आणि या सगळ्यात…. रात्र मात्र स्वतःच मनोरंजन करून घेत वेळेला बुजवत आहे….. खरंतर बुजऊ बघत आहे….

…...स्वप्न तेवढे माझा पिच्छा करत आहेत. स्वतःचे दिवस त्या रात्रीत काढत आहेत …. माझे आठवणे मात्र म्हातारे झालेय…. तेही निरागसच . जसे आठवेल तसेच जुळवून मी हसत असतो…..वयासोबत वाढत चाललेला मी, त्या दिनक्रमाआधीच मग नवीन सुचण्यावर मुक्काम करतो….


By Amol Kharat



Recent Posts

See All

Kommentare

Mit 0 von 5 Sternen bewertet.
Noch keine Ratings

Rating hinzufügen
SIGN UP AND STAY UPDATED!

Thanks for submitting!

  • Grey Twitter Icon
  • Grey LinkedIn Icon
  • Grey Facebook Icon

© 2024 by Hashtag Kalakar

bottom of page