By Dr Madhavi Rambhau Bhagat
पुढच्या जन्मी पाऊस चं व्हावा म्हणतीये
मात्र बरसण्याने माझ्या
शहारून जावे सर्व काही
माझ्यावर ही व्हाव्या कविता भरमसाठ
आणि भरावी कोऱ्या कागदांची वही..
पुढच्या जन्मी पाऊस चं व्हावा म्हणतीये
काहींना हवीहवीशी तर
काहींना नकोशी ही वाटावी
माझीही कुणीतरी आतुरतेने वाट पाहून
स्वप्न निराळी थाटावी
पुढच्या जन्मी पाऊस चं व्हावा म्हणतीये
माझ्यामुळे ही फुटावा आशेचा
अंकुर एखाद्या मनी
पसरावी हिरवी चादर चहूकडे
आणि फुले फुलावी माळरानी
पुढच्या जन्मी पाऊस चं व्हावा म्हणतीये
वरून आभाळातून मला ही दिसावी
कहाणी हरएकाची
मनात साठलेलं आटलेलं धो - धो
कोसळवून मीही मोकळी व्हावी एकदाची..
By Dr Madhavi Rambhau Bhagat
Comments